बुधवार, 7 अक्टूबर 2020

ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग संबंधी उपयोगात येणाऱ्या सेटीन्ग्स

 नमस्कार मित्रांनो,

आज आपण आपल्या फोन मध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग  संबंधी उपयोगात येणाऱ्या सेटीन्ग्स बद्दल जाणून घेणार आहोत. 


जर आपल्याकडे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असलेला मोबाईल फोन आहे तर या फिचर बद्दल आपल्याला माहित असलेच पाहिजे.





या फिचर चा काय फायदा आहे.?

मित्रांनो बऱ्याचदा आपण कॉल संपल्यावर विचार करतो कि हा कॉल रेकॉर्ड केला असता तर बार झालं असतं कारण खूप महत्वाचं बोललो होतो. किव्वा कॉल वर आपल्याला एखादा मोबाईल नंबर सांगितला गेला जो लिहून घ्यायचा होता आणि आपल्या कडे लिहिण्याचा काही पर्याय नव्हता, किव्वा काही हि असं जे लक्षात ठेवायला अवघड आहे ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेऊ शकत होता, पण कॉल रेकॉर्ड करायची आठवण राहिली नाही.  अशा वेळेस आपल्याला गरज भासते कि ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंग करता येते का?

तर मित्रांनो आता बऱ्याच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल फोन मध्ये हे फिचर येत आहे.


काय काय सेटिंग करता येतात?

* एक तर आपण कोणते कॉल्स रेकॉर्ड कराचे आणि कोणते नाही ते ठरवू शकतो.

* किती कॉल्स रेकॉर्ड करायचे आहे जेणे करून मोबाईल स्टोरेज पण जास्त भरायला नको.

*रेकॉर्ड झालेले कॉल्स स्टोअर करून ठेऊ शकतो कायम स्वरूपी. आणि अजून बरेच काही.


तर जाणून घेऊ या याच्या साठी सेटिंग कशी चालू करावी?

Setting -->

System app  -->

call -->

call recording-->

इथे रेकॉर्डिंग चालू करण्यासाठी तीन ऑप्शन दिसतील


record specific calls  ( विशिष्ट नम्बरहून येणारे कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी )

record unknown calls  ( नवीन नंबरहुन येणारे कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी )

record all calls  ( सर्व कॉल्स रेकॉर्ड करण्यासाठी )

maximum recording  ( जास्तीत जास्त किती रेकॉर्डिंग सेव्ह करायच्या आहेत )

view call recording  ( सर्व कॉल्स रेकॉर्ड शोधणे )


अधिक माहिती साठी हा विडिओ पहा.


जर आपल्याला या संदर्भात कोणती हि अधिक माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये जरूर कळवा.

आमचे युट्युब चॅनेल सुब्स्क्राइब करून विडिओ आवडल्यास शेअर व लाईक करा.
https://www.youtube.com/channel/UCXZv5TNxmiKc5S69pVxBxUw

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें