बुधवार, 13 जून 2018

संगणक क्षेत्रातील करिअरच्या संधी



आज संगणक फक्त कोणत्या एका क्षेत्रासाठी मर्यादित नाही. आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक युवकाला चांगले करिअर करण्याची इच्छा आहे. तुम्हाला देखील चांगले करिअर करण्याची इच्छा असल्यास संगणकाशी मैत्री करा. आजचे युग हे संगणकाचे युग म्हणवले जाते. त्यामुळे संगणकाच्या क्षेत्रातच नव्हे तर अन्य क्षेत्रातील करिअरसाठीही संगणकाचे ज्ञान अपरिहार्य आहे. आज बेसिक कॉम्प्युटर कोर्स करुन सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
बेसिक कोर्स -
बेसिक कोर्समध्ये संगणकाशी संबंधीत प्राथमिक माहिती देण्यात येते. संगणकाचे मूळ भाग, मॉनिटर, की-बोर्ड, पेन ड्राईव्ह, सीपीयू, माऊस, प्रिंटर, स्पीकर, सीडी-डिव्हिडी, मोडेम, हार्ड डिस्क, रॅम, मदर बोर्ड, प्रोसेसर, शट-डाऊन, डेस्कटॉप, फाइल्स, कट, कॉपी, पेस्ट आदींबद्दल मार्गदर्शन केले जाते. या कोर्सनंतर भारताच्या कानाकोपऱ्यात संगणक क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
वाढती मागणी -
आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाला मागणी आहे. यामुळे यामध्ये तज्ज्ञ मंडळींना देखील मागणी आहे. अशा वेळी ऍडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन कोर्स करणे फायद्याचे ठरू शकते. हा कोर्स साधारण एक वर्ष कालावधीसाठी असतो. मागील काही वर्षांमध्ये युवकांचा कल माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे अधिक वाढल्याचे चित्र आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचा कल 10 वी 12 वीनंतर कॉम्प्युटर कोर्स करण्याकडे अधिक भर असतो.
अनेकांसाठी उपयोगी -
बारावीच्या परिक्षांमध्ये चांगले गुण प्राप्त न करू शकणाऱ्या किंवा इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स न करू शकणाऱ्या विद्यार्थांसाठी बेसिक कॉम्प्युटचा कोर्स फायदेशीर ठरू शकतो. वाढती मागणी ः ज्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा विकास होत आहे त्या अनुषंगानेच प्रत्येक क्षेत्रात संगणकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज शाळा, विमानतळ, कारखाने, कोर्ट, प्लेसमेंट एजन्सी आदी सर्व ठिकाणी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर संगणकाचा वापर केला जात आहे. त्यामुळे यामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
पात्रता -
संगणकाशी संबंधित कोर्स करण्यासाठी तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असणे गरजेचे आहे. हे कोर्स कमी कालावधीसाठी असल्याने तुम्ही 10 वी किंवा 12 नंतर किंवा त्यापूर्वीदेखील करू शकता. त्याशिवाय इतर विषयांशी संबंधित शिक्षण घेतदेखील तुम्ही हे कोर्सेस करू शकता. ऍडव्हान्स डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा कोर्स पूर्ण केल्यानंतर डिझाइन अँड डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग, नेटवर्किंग, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्राफिक डिझाइन, अकाउंटिंग, सॉफ्टवेअर टेस्टर, कस्टमर केअर विभाग आदी ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळू शकते.
वेतन - ऍडव्हान्स कोर्सेस पूर्ण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात साधारण 15 ते 20 हजार इतके वेतन तुम्हाला मिळू शकते.

मंगलवार, 12 जून 2018

शेतीला तंत्रज्ञानाची जोड







आज तंत्रज्ञानाच्या युगात शेतीमध्ये तंत्रज्ञानाची जोड केल्यास शेतीमध्ये शेतीक्षेत्रात विलक्षण विकास शेतकऱ्याला सध्या करता येईल.