बुधवार, 15 नवंबर 2023

प्रत्येक देवाच्या मंदिरात प्रवेशद्वाराबाहेर कासव का असते?

 


आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर तिथे सर्वात पुढे आपल्याला कासव असल्याचे दिसते !

मंदिरात कासव का असते ? जाणून घ्या...

कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो.
कासवाला श्रीविष्णूकडून तसे वरदान ‍मिळाले आहे. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते. कासवाला सत्त्वगुणामुळे ज्ञान प्राप्‍त झाले आहे.

कासव हे श्रीविष्‍णूला शरण आले होते. यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे लक्ष नेहमी देवतेच्या चरणांकडे असते.

काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली दिसते. मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे. श्रीविष्‍णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे.

आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.

कासवाचे गुण :कासवाला ६ अंग (४ पाय १ तोंड १ शेपूट =६ ) असतात तसेच माणसाला ६ शत्रु असतात
काम ,क्रोध ,मद ,लोभ ,मोह आणि मत्सर
.

कासव हे सर्व सोडुन नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडुन मंदिरात यावे.

कासव हे आपल्या पिलाना डोळ्यातुन प्रेम देवून वाढवते त्याच प्रमाणे देवाने आपल्या वर क्रूपा द्रुष्टी ठेवावी ही भावना आहे.

कासव आपली अष्ट अंग नमस्कार करते त्याप्रमाणे आपण पण करावा, यांकरीता कासव मंदिरात असते.

कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेवू शकते त्याप्रमाणे मंदिरात देवासामोर जाताना भक्ताचा इंद्रियनिग्रह, इंद्रियांवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. इंद्रिये मोकाट सोडून परमेश्वराची भक्ती होवू शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते.

कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ :



कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

नमोस्तुते !

प्रत्येक मंदिरात कासव का असते,जाणुन घ्या !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें